• A
  • A
  • A
वडवणीच्या ज्ञानगंगा वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना विषबाधा; प्रकृती धोक्याबाहेर

बीड - वडवणी शहरातील एका खासगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर बाधीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. वडवणीतील ज्ञानगंगा वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थांनावर उपचार सुरू असताना


हे ही वाचा - पुण्यात घरगुती जेवणातून १४ जणांना विषबाधा
वडवणी शहरातील न्यायालय परिसरात ज्ञानगंगा वसतिगृह असून परमेश्वर चव्हाण हे या वसतिगृहाचे संचालक आहेत. पहिली ते दहावी पर्यंतचे सुमारे ४० विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. रविवारी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना बाजरीच्या भाकरी आणि वरण हे पदार्थ देण्यात आले होते. त्यानतंर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना अचानक उलटी, मळमळ असा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच संचलाक चव्हाण यांनी खासगी वाहनातून एकूण १४ विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

नितीन ज्ञानेश्वर आडे (९), सुदर्शन सुनिल वैराळे (१२), योगेश बिभीषण हजारे (१२), अभिजित अनिल पवार (१०), करण दत्ता कांबळे (१०), आकाश मच्छिंद्र केकाण (०९), दत्ता बालासाहेब तोंडे (१४), भिमराव प्रल्हाद शेळके (११), उमेद दिलीप वायसे (१२), पंकज बंडू लवटे (९), कुणाल रामेश्वर राऊत (११) , कृष्णा बाबासाहेब व्हरकटे (१२) , करण विजय सांगे (११), छत्रपती बाबूजी वगरे (१४) या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील बालरोग कक्षात उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

विषबाधा कशातून?....

दरम्यान, वसतिगृह संचालक परमेश्वर चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, पाणी टंचाईमुळे ३ दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी आणले जाते आहे. पाण्यातील बदलामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही.

अन्न प्रशासन घेणार नमुने...
विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणात आता अन्न प्रशासनही कामाला लागले असून अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व हृषीकेश मरेवार यांनी प्रकरणाची दखल घेतली. विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा - विषबाधा प्रकरणः तपासणी अहवालनंतरच सत्य बाहेर येईल - प्रकल्प अधिकारी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES