• A
  • A
  • A
मी आणलेल्या कामांची उद्घाटने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा - पंकजा मुंडे

बीड - परळी मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मात्र, मी आणलेल्या कामांची उद्घाटने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. विकास कामांचे नारळ फोडण्याची एवढीच हौस होती तर मागच्या वेळी सत्ता असताना का तुम्हाला निधी आणता आला नाही, असा खडा सवाल ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला.


हेही वाचा - राष्ट्रवादीचं नामकरण भ्रष्टवादी करा, पंकजा मुंडेंचा निशाणा
शुक्रवारी परळी तालुक्यातील मांडवा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ९६ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांसह रस्ते, तीर्थक्षेत्र विकास आणि अन्य ७ कोटी ४८ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी या भागाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. खूप संघर्षातून ते सत्तेत आले पण नियतीला ते मान्य नव्हते, त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. मांडव्याची पाणीपुरवठा योजना करूनच गावात येईल, असा शब्द मी दिला होता, तो मी पुर्ण केला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा खोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह सर्व कांही दिले. जनतेच्या पायावर विकासाचा अभिषेक मला करायचा आहे, त्यासाठी तुमचे आशीर्वाद सदैव मला पाहिजेत, असे मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा - विरोधकांना मुंडे कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची सवय -...
जिल्ह्याचा विकास साधला


केवळ मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास साधण्याचे काम केले असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याला प्रगतीपथावर न्यायचे आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचे काम सर्वत्र दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आणल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ६१६ कोटी रूपये मंजूर करून घेतले. त्यापैकी १२६ कोटी रूपये जमा देखील झाले आहेत. कामात चालणारी बोगसगिरी बंद केली त्यामुळे आज चित्र बदलले आहे.

राष्ट्रवादीवर हल्लाबोल

मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे करायचे याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजूनही पेचात आहेत. भाषणात गप्पा ठोकणाऱ्यांचेही उभे राहण्याचे धाडस होत नाही. उमेदवारीबद्दल विचारले की सांगतात शरद पवारांनी आदेश दिला तर उभे राहू, अशा वेळी पवारांची आठवण येते मग तोडपाणीचे राजकारण करताना कशी त्यांची आठवण येत नाही, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीचा उमेदवार कुणीही असो येथील जनता मुंडे साहेबांचा स्वाभिमान कमी होवू देणार नाही, असा ठाम विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES