• A
  • A
  • A
कचऱ्याची समस्या; सिल्लोडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

औरंगाबाद - सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या दूर न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन करण्यात आले.


प्रभाग क्रमांक ३ मधील समतानगर, शिवाजीनगर, शिक्षक कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, वाघवाडी, सपकाळवाडी या परिसरात नगर परिषद निवडणुकीनंतर हेतू पुरस्सर नगर परिषदेमार्फत घंटागाडी बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - लोकसभा निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचा जाहीरनामा; मागण्या मान्य करेल त्याला मत
त्यामुळे या परिसरातील नागरिक घरातील कचरा आसपासच्या परिसरात टाकत असल्याने दुर्गंधी वाढली होती. त्यामुळे २४ तासाच्या आत हा परिसर कचरामुक्त न केल्यास परिसरातील डुक्कर पकडून नगर परिषद कार्यालयात सोडून आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेविका अश्विनी पवार व रुपाली मोरेल्लू यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदनाद्वारे दिला होता.

हेही वाचा - आमदार सत्तार, खोतकरांमध्ये औरंगाबादेत बैठक; राजकीय वर्तुळात खळबळ
निवेदन देऊनही परिसरात स्वच्छता न झाल्याने किरण पवार, मनोज मोरेल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी डुकरांची पिल्ले सोडून आंदोलन करण्यात आले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES