• A
  • A
  • A
लोकसभा निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचा जाहीरनामा; मागण्या मान्य करेल त्याला मत

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी या वेळेस शेतकऱ्यांचा देखील जाहीरनामा असणार आहे. शेतकऱ्यांची बैठक औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी जाहीरनामा तयार केला. या जाहीरनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल, त्या उमेदवाराला मतदान करणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी मांडली.

शेतकऱ्यांची बैठक


गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. राजकीय पक्ष शेतकऱ्यांना आश्वासनांपेक्षा पुढे काही देत नाहीत. त्यामुळे यावेळेस मतदानाच्या आधी जाहीरनामा मंजूर करावा आणि मतदान घ्यावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
बीड बायपास रस्त्यावर शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर शेतकऱ्यांनी स्वतःचा जाहीरनामा तयार केला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रलंबित मागण्या त्यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, शेतीमालाला हमीभाव देणे, या आणि अशा इतर मागण्या या जाहीरनाम्यात ठेवण्यात आल्यात.

जो राजकीय पक्ष या जाहीरनाम्याला मंजुरी देईल, त्या पक्षाला किंवा उमेदवाराला शेतकरी मतदान करेल, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. आगामी काळात हा जाहीरनामा सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देण्यात येणार आहे. इतकेच नाही जो पक्ष या जाहीरनाम्याला मंजूर करेल त्यांच्याकडून लेखी आश्वासन देखील घेण्यात येणार आहे. त्यानंतरच शेतकरी आपले मतदान देईल, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जाहीरनामा देत असताना भाजपला हा जाहीरनामा देण्यात येणार नाही. भाजपने मागच्या चार वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES