• A
  • A
  • A
चंद्रकांत खैरे पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांच्या औरंगाबाद येथील प्रचार कार्यालयाचे आज औपचारिकरित्या उद्धाटन करण्यात आले. खैरे हे युतीचे उमेदवार असले तरी त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दांडी मारली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी खैरेंवर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


हेही वाचा-अनेकांच्या 'बळी'नंतर प्रशासनाला जाग; बीड बायपासवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यावेळी पाचव्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आपल नशीब आजमवणार आहेत. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या समर्थ नगर भागात त्यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन केले. मागील काही वर्षात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खैरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. औरंगाबादमध्ये भाजपने स्वतःचा वेगळा उमेदवार द्यावा, अशी इच्छा भाजप पदाधिकाऱ्यांची होती. मात्र, युती झाल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. खैरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजप पदाधिकारी शिवसेनेपासून वेगळे असल्यासारखे भासवत आहेत.
खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले नसल्यामुळे अनेक अफवांना उधाण आले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिवसेनेवर नाराज खैरेंचा प्रचार करायला तयार नाहीत. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे. जोपर्यंत शिवसेना काँग्रेसबरोडबरची युती तोडणार नाही, तोपर्यंत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हे शिवसेनेचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. मात्र, सेनेने अद्याप युती तोडली नाही. त्यामुळे प्रचार करताना शिवसेनेचा प्रचार कसा करावा? असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे. याचा प्रत्यय वारंवार शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून येतोय. या प्रश्नावर खैरे यांनी सावध भूमिका घेत भाजप आमच्या सोबतच असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा-कोळसे पाटील जनता दलाकडून उतरणार लोकसभेच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES