• A
  • A
  • A
भाजप-सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी औरंगाबादेत बैठक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत श्रीहरीं पेवेलीयन येथे १७ मार्चला युतीच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा - औरंगाबाद - जालना लोकसभा काँग्रेसकडे
लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांनी युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रचाराचा धुराडा उडायला सुरुवात झाली आहे. त्यात सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा औरंगाबादेत आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोळसे पाटील जनता दलाकडून उतरणार लोकसभेच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास कदम असे सेना-भाजपचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना हे नेते मार्गदर्शन करून निवडणुकीची रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES