• A
  • A
  • A
अनेकांच्या 'बळी'नंतर प्रशासनाला जाग; बीड बायपासवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

औरंगाबाद- बीड बायपास रोडवर अपघातांची मालिका सुरूच असून गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो निष्पापांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. मागील २ महिन्यांत १० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता मनपा आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली असून मुळे सर्वसामान्यांत समाधानाचे वातावरण आहे.बीड बायपास रस्ता मागील अनेक वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला होता. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात. यात निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले. २ दिवसांत महिलांना ट्रकने चिरडल्याच्या २ घटना घडल्याने मनपा आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून मोठमोठ्या मंगलकार्यालये आणि हॉटेलने हा रस्ता व्यापला होता. यातील अनधीकृत बांधकामांवर मनपा आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करत ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवली आहेत. येत्या काळात हा रस्ता मोकळा श्वास घेईल आणि परिणामी अपघातांच्या संख्येत घट होईल, अशी अपेक्षा सामान्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES