• A
  • A
  • A
औरंगाबाद - जालना लोकसभा काँग्रेसकडे

औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबाद आणि जालना या जागेवरील निवडणूक काँग्रेसच लढवेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार आणि औरंगाबादचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. औरंगाबादमध्ये काँग्रेसने पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.


औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड नामदेव पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचे नाव तर जालनामधून आमदार अब्दुल सत्तार आणि माजी आमदार कल्याण काळे यांच्यापैकी एक नाव काँग्रेसतर्फे जाहीर केले जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
औरंगाबाद आणि अहमदनगर या २ जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागांची अदलाबदल करावी अशी मागणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. औरंगाबाद जिल्हावरील दावा काँग्रेस सोडायला तयार नाही तर दुसरीकडे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देत नसल्याने सुजय विखे पाटील यांनी भाजपत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता जागांची अदलाबदल हे जवळपास अशक्य मानली जात आहे. त्यामुळेच आता औरंगाबाद आणि जालना लोकसभा ही काँग्रेसच लढवेल असा विश्वास काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
जालना लोकसभा मतदारसंघात माजी आमदार कल्याण काळे यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळेस ८ हजार मतांनी त्यांचा पराभव हा झाला होता. मात्र, आता कल्याण काळे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पूर्ण पक्ष त्याच निष्ठेने काम करेल आणि यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव जालना मतदारसंघात होईल, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे.
सोयगाव तालुक्यातून खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. हेच कळत नाही तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात येणार आहे. त्याची तयारी देखील सुरू केल्याचे अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस औरंगाबाद आणि जालना लोकसभा लढवण्यास इच्छुक असली तरी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेदेखील अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केल आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चित यश मिळेल त्याचबरोबर वंचित आघाडीला किंचित मतदेखील मिळणार नाहीत, अशी टीका यावेळी सत्तार यांनी केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES