• A
  • A
  • A
हॉटेल मॅनेजरचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; घातपताचा संशय

औरंगाबाद - येथील एका हॉटेल मॅनेजरचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. हॉटेल मॅनेजर असलेल्या गोकुळ आप्पासाहेब चव्हाण या २८ वर्षीय तरुणाचा राहत्याघरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.


मृत चव्हाण यांच्या शरीरावर रक्ताचे डाग, आणि जखमा असल्याने घातपाताचा संयश व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी बिडकीन येथील कल्याण नगर परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- व्हॉट्सअॅपवरील अश्लील मॅसेजला कंटाळून प्राध्यापकाची रेल्वे रूळावर आत्महत्या

मृत गोकुळ हे एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होते. आज सकाळी गोकुळ यांचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह रक्ताने माखलेला असून अंगावर जखमांच्या खुणा देखील आहे. अंगावरील जखमा पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तर मृताची पत्नी देखील जखमी आहे. पत्नी नेमकी कशी जखमी झाली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हेही वाचा- अमरावती-नागपूर मार्गावर अपघात, कार खाणीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES