• A
  • A
  • A
मुंबई महामार्गावरील खोजेवाडी येथे भीषण अपघात; १ ठार ८ जखमी

मुंबई - दोन चारचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना औरंगाबाद मुंबई महामार्गावर खोजेवाडी येथे घडली आहे. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यात १ जणाचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


नवाब शाह महेबूब शाह (वय ३५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, महेबूब कादर शाह (वय ६३), जुबेदा महेबुब शाह (वय ४०), रुकसाना मुनिर शाह (वय ४०), जयंत श्रीवास्तव (वय ५८), उल्का जयंत श्रीवास्तव (वय ५०), योगिता अश्विन श्रीवास्तव (वय २७), इशांत श्रीवास्तव (वय २७), अश्विन जयंत श्रीवास्तव (वय २९) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व नागपूरचे रहिवासी आहेत.
पोटूळ येथे नातेवाईकांच्या घरी लग्नसमारंभाचा कार्यक्रम आटोपून शाह परिवार सजापुरकडे चारचाकीने (एम एच १२ ई जि १९८८) जात होता. तर श्रीवास्तव परिवार हा नागपूरहून शेगावला आला होता. दर्शनासाठी ते पुढे शिर्डीला आपल्या चारचाकीने (एम.एच.३१ ई.क्यू ०६८९) जात होते. औरंगाबाद - मुंबई महामार्गावरील खोजेवाडी जवळ येताच दोन्ही कार चालकांचे कारवरील नियंत्र सुटले. दोन्ही कार समोरासमोर येऊन धडकल्या. या अपघातात कार चालक नवाब शाह यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES