• A
  • A
  • A
चालत्या गाडीला आग, नव्या कारचा झाला कोळसा

औरंगाबाद - चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे दुपारच्या सुमारास घडली. आग लागताच प्रसंगावधान राखीत कारचालक बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत मारुती सुझुकी बलेनो ही कार जळून खाक झाली आहे.


हेही वाचा-काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीनंतरच जागा वाटपाचा निर्णय - जयंत पाटील
ही कार चिकलठाण्याच्या दिशेने जात असताना तिने अचानक पेट घेतली. आग इतकी भीषण होती, की आगीत कारचा कोळसा झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली. भर रस्त्यात कारला आग लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
हेही वाचा-प्रचारासाठी जवानांचे छायाचित्र न वापरण्याची निवडणूक आयोगाची सक्ती
गाडीला अचानक आग लागल्याने जवळपास अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES