• A
  • A
  • A
शॉक लागून मुलाचा मृत्यू; मनपासह विजवितरणच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद - शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागल्याने आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या वडिलांनी मनपा व विजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

श्रेयस उर्फ आदित्य संजय क्षीरसागर


टिव्ही सेंटर येथील रहिवासी असलेला श्रेयस उर्फ आदित्य संजय क्षीरसागर हा सहावीत शिकत होत. तो टीव्ही सेंटर भागात शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुख्य चौकात मोठी गर्दी असल्याने मिरवणूक पाहायला मिळेल, या अशेपोटी श्रेयस टीव्ही सेंटर मैदानात उभारलेल्या गच्चीवर गेला. मात्र गच्चीच्या तीन ते चार फुटावरच विद्युत वितरण कंपनीच्या विजेच्या तारा लोंबकळत होत्या. त्या श्रेयसला अंधारात दिसल्या नाहीत. त्यामुळे हाताचा स्पर्श झाल्याने तो होरपळला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनपा व वीजवितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृताच्या वडिलाने केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES