• A
  • A
  • A
जिद्दीला सलाम, परिस्थितीवर मात करत 'ती' झाली पोलीस उपनिरीक्षक

औरंगाबाद - अशिक्षित आई-वडिल आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना एक तरुणी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मंगल महादेव सुडके असे तिचे नाव असून, ती पैठण तालुक्यातील धनगरवाडा येथील रहिवासी आहे. तिने या परीक्षेत राज्यात ४४ वा क्रमांक मिळवला.

मंगल महादेव सुडकेमुलगी म्हटले की, शिक्षणासाठी घरातूनच नकार असतो. त्यात परिस्थिती जर जेमतेम असेल तर विचार न केलेलाच बरा. मात्र, अशा परिस्थितीत मंगल सुडकेला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. अभ्यासातील जिद्दीपणा परिस्थितीपुढे तिने सोडला नाही. आई-वडिलांना शेतात मदत करण्याचे कामही तिने केले. कष्ट करण्याची सवय त्यामुळेच तिला लागली.


गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून तिने कष्टाने अभ्यास केला. आई शेतात काबाडकष्ट करून मुलगी शिकावी यासाठी प्रयत्न करत होती. आई-वडिलांनी केलेल्या कष्टातून तिच्या शिक्षणाला आधार मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात ती उत्तीर्ण झाली असून, तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यामुळे आई वडिल, भाऊ व नातेवाईकांतून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगलच्या वडिलांना जेमतेम दिड एकर जमिन असून शेती काम करुन मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण केले. त्या कष्टाचे त्यांना फळ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे.


गरिबीतून सुध्दा कष्टाने यश संपादित करता येते हेच या मंगल सुडकेने दाखवून दिले आहे. मंगलच्या या यशाबद्दल पैठण शहरातील धनगरवाडा परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


परिस्थितीला झुगारुन ज्या प्रमाणे मंगलने परीक्षेत यश मिळवले. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मंगलचा आदर्श घ्यावा, असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनिल वीर यांनी व्यक्त केले.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES