• A
  • A
  • A
इसिसशी संबंधित ८ संशयितांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - इसिसशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ९ जणांना दहशतवादी विरोधी पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले होते. बुधवारी त्यातील ८ जणांना जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात पाठविले आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर विघातक कारवाई करण्याच्या संशयातून तसेच इसिस संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून त्यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला ठाणे जिल्ह्यातील मुंब्राच्या तरुणांचे इसिसशी संबंध असल्याची माहिती मिळाली होती.
हेही वाचा - युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनवत होता २०० च्या बनावट नोटा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंगळवारी मुंब्रासह औरंगाबादमध्ये छापे टाकून त्यांना मोहसीन सिराजोद्दीन (३२, रा. दमडी महल मुंब्रा), मजहर रशिद शेख (२१, रा. सागर बिल्डींग मुंब्रा), मो. तकी उर्फ अबु खालीद सिराजउद्दीन खान (२०, रा. राहत कॉलनी, मुंब्रा), मो. मुशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैसर कॉलनी औरंगाबाद), मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२०, रा. राहत कॉलनी मुंब्रा), जम्मन नवाब खुटेउपड (३२, रा. मुंब्रा), सलमान सिराजउद्दीन (२८, रा. मुंब्रा), फहाज सिराजउद्दीन (२८, रा. अकमास कॉलनी मुंब्रा) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १० हार्डडिस्क, उंदीर मारायचे औषध, ३० च्यावर सिम कार्ड, बॅटरी, थिनर सारखे वास येणारे रसायन, व्हिनेगर सारखा वास येणारे रसायन, सेल आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES