• A
  • A
  • A
धक्कादायक.. स्ट्रेचर न मिळाल्याने नवजात शिशुचा जमिनीवर आपटून मृत्यू

औरंगाबाद - गर्भवती महिलेस स्ट्रेचर न मिळाल्याने नवजात शिशुचा खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घाटी रुग्णालयात घडली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली खटमोडे असे गर्भवती महिलेचे नाव आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


हेही वाचा - तज्ज्ञांची अनुपस्थिती; प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू, खामगावच्या...
सोनाली खटमोडे या छावणी येथे माहेरी बाळंतपण करण्यासाठी आल्या होत्या. सोनाली यांना रात्री एकच्या सुमारास प्रसूतीकळा सुरु झाल्याने त्या आई आणि पतीसह घाटी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी स्ट्रेचर नसल्याने तिघेही लिफ्टपर्यंत चालत आले होते. लिफ्टच्या दरवाज्यापर्यंत पोहचल्यावर महिला प्रसूत झाल्याने शिशू खाली पडले. नवजात शिशू जन्मताच खाली पडल्याने दगावले.
गर्भवती महिला वेळेवर आली असती तर व्यवस्थित उपचार करता आले असते तसेच हा प्रकार टाळता आला असता अशी प्रतिक्रिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा - ‘नकोशी’ला मध्यरात्रीच फेकले रस्त्यात; पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES