• A
  • A
  • A
'एटीएस'कडून मुंब्रा, औरंगाबादमध्ये छापे, ९ संशयितांची चौकशी

मुंबई - आयएसआयएस संबंधाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) देशभरात छापेमारी सुरू असतानाच, दहशतवाद विरोधी पथकानेही (एटीएस) राज्यात कारवाई सुरू केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये आज सकाळी छापा टाकून ९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा - आयएस मॉड्यूल चलावण्याच्या संशय, एनआयएची पुन्हा छापेमारी

आयएसआयएसपासून प्रेरणा घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम' या दहशतवादी गटाचा देशात मोठा घातपात घडवण्याचा कट एनआयएने 26 डिसेंबरला उधळून लावला होता. याप्रकरणी एनआयएने दिल्लीसह उत्तरप्रदेशात छापेमारी केली होती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने मुंब्रा आणि औरंगबाद या भागात ही कारवाई केली आहे.


हेही वाचा - लंडनमधील 'ती' पत्रकार परिषद काँग्रेस प्रणित होती, रविशंकर प्रसाद यांचा पलटवार
ठाण्यातील मुंब्रामधील अलमास कॉलेनीतील सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मजहर शेख (वय २१) या तरुणाच्या घरी सोमवारी मध्य रात्री छापा टाकला. पोलिसांनी त्यांच्या घरातून सर्व मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. मजहर रविवारी औरंगाबादमध्ये मित्राच्या लग्नासाठी गेला होता. मजरफ याच्यासह इतर दोघांना ठाणे एटीसने ताब्यात घेतले आहे.
बंगलोरमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेची औरंगाबादमधील शाखा सलमान नावाचा तरूण चालवत होता. मुंब्रा येथील मझहरसह मोहसीन खान आणि फहाद शाह हे दोघे सलमानच्या संपर्कात होते. या तिघांनाही ठाणे एटीएसने ताब्यात घेतले असून तिघेही उच्चशिक्षित आहेत. सलमान याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एटीस पुढिल तपास करीत आहे
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES