• A
  • A
  • A
दुचाकीवर हात सोडून हुल्लडबाजी करणे पडले महागात, तरुण जखमी

औरंगाबाद - दुचाकीवर हुल्लडबाजी केल्याचे अनेक व्हिडिओ आपण बघतो. मात्र, दुचाकीवर हात सोडून हुल्लडबाजी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. विशेष म्हणजे या प्रकाराचा तो आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने तो समोरुन येणाऱ्या व्यक्तीला धडकला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.


धुळे-सोलापूर महामार्गावर श्रीरंग बोंबले हा तरुण आपल्या दुचाकीवर उभा राहून हात सोडून गाडी चालवत होता. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. हात सोडून आपण कशी गाडी चालवतो याचा व्हिडिओ तो बनवू लागला. मात्र, त्याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने तो समोरुन येणाऱ्या व्यक्तीला धडकला. तरुणाला पाचोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गाडी चालवताना जीवघेण्या कसरती करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES