• A
  • A
  • A
हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

औरंगाबाद - न्यायालयीन कोठडीत असलेल्या युवकाचा हर्सूल कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला आहे. बेदम मारहाण केल्यानेच युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. योगेश राठोड असे या युवकाचे नाव आहे.

नातेवाईकांशी चर्चा करताना पोलीस


युवक योगेशच्या शरिरावरील मारहाणीच्या जखमा

योगेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. योगेश राठोड हा गवंडी काम काम करत होता. त्याच्याविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. १७ जानेवारीला हर्सूल पोलिसांनी योगेशला न्यायालयात हजर केले. यावेळी त्याच्या जामिनासाठी कुणीच न आल्याने त्याला न्यायालयाने कारागृहात पाठवले. त्याला वैद्यकीय तपासणी करून सायंकाळी ७ वाजता पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

योगेश राठोड बेशुद्ध अवस्थेत असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्याच्या शरीरावर जखमा असल्याने प्रचंड मारहाण करण्यात आल्याने तो बेशुद्ध झाला होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याच्यावर घाटी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या हातावर पाठीवर पायवर आणि पोटात गंभीर मारहाण झाल्याचे दिसून येत होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. कारागृहातील पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी नातेवाईकांनी केली. जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका नातेवाईकांनी घेतली आहे. नातेवाईकांचा रोष अधिक वाढत असल्याने तातडीने घाटी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES