• A
  • A
  • A
धक्कादायक ! झोमॅटोवरून मागवलेल्या पनीर चिलीत निघाले 'प्लास्टिक'

औरंगाबाद - जेव्हा तुमच्या पोटात भुकेने कावळे ओरडत असतात तेव्हा ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याच्या विचार तुमच्या मनात येतो आणि डोळ्यासमोर झोमॅटोचे अॅप तरळते.अशीच एक ऑर्डर औरंगाबाद येथील ग्राहकाने काल झोमॅटोवरून केली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, त्या ग्राहकाने मागवलेल्या पनीर चिलीत त्याला पनीर ऐवजी चक्क प्लास्टिकचे तुकडे आढळून आलेत.

फोटो सौजन्य - एएनआय ट्विटर


हेही वाचा - शेतकरी वडिलांचे हाल पाहून मुलीने बनविले फवारणी यंत्र

सचिन जमधारे असे त्या ग्राहकाचे नाव असून त्यांनी झोमॅटो आणि ऑर्डर केलेल्या हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले की, जेवताना माझ्या मुलीने तक्रार केली पनीर तुटत नाहीय, त्यांनतर जेवण नीट पाहिले असता मला त्यात प्लास्टिक आढळून आले. ज्या हॉटेलमधून हे जेवण मागवले त्या हॉटेलचे नाव एस स्क्वेअर असे आहे.

सचीन जमधडे यांनी झोमॅटोवरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नव्हता. निरखून पाहिले असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचे लक्षात आले. सचिन जगधडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकाने उडवा- उडवीची उत्तरे दिली. सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हॉटेल एस स्क्वेअर असे या हॉटेलचे नाव आहे. प्लास्टिक सदृश असणारा पदार्थ एफडीएकडे तपासणीसाठी दिला असल्याची माहीतीही जमधडे यांनी दिली. मात्र ज्या हॉटेलमधून पनीर चिली मागवले त्या हॉटेल चालकाने आपल्याकडून चांगलाच पदार्थ पाठवत असून मध्ये काही झाले असेल तर माहीत नाही असे उत्तर दिले.

यापूर्वी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी ऑर्डर केलेले जेवण चोरुन स्वत:च खात असल्याचे दिसत होते. या प्रकरणानंतर झोमॅटोवर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

हेही वाचा - मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच आईने घेतला गळफास; लातूरमधील धक्कादायक घटनाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES