• A
  • A
  • A
ऐक्यासाठी मंत्रीपद सोडून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार- आठवले

औरंगाबाद - नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आयोजित केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या सभेत प्रकाश आंबेडकर समर्थकांनी गोंधळ घातला. खुर्च्यांची तोडफोड तसेच मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सभेत बोलताना आठवले यांनी मोठ्या नेत्यांवर टीका करताना आमच्या नेत्यांनी भान ठेवायला हवे. तसेच ऐक्यासाठी मंत्रीपद सोडून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.


सभेतील गोंधळानंतर पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलायला उभे राहिल्यानंतर जमाव शांत झाला. आरपीआयच्या नेत्यांनी बोलताना भान ठेवून बोलायला पाहिजे. कुठल्याही मोठ्या नेत्यांवर टीका करणे योग्य नाही, असे यावेळी आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २५ व्या नामविस्तार दिनाची सभा सुरू होती. यावेळी एका नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घातला. यावेळी संतप्त आंबेडकरी समर्थकांनी दगडफेक करीत खुर्च्या तोडल्या. पोलीस हस्तक्षेप करत संतप्त जमावाला शांत केले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES