• A
  • A
  • A
औरंगाबाद विद्यापीठात 'प्रतिसाहित्य' संमेलन;नयनतारांचे भाषण वाचून होईल उद्घाटन

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण रद्द केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची ज्यांची नैतिक जबाबदारी आहे, त्यांनीच बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बूज राखण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी उद्या (दि.११) प्रतिसाहित्य संमेलन आयोजित करत आहेत. या संमेलनात प्रतिष्ठीत साहित्यिक सहभागी होणार आहेत.


यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल करणार होत्या. पण, काही लोकांनी त्यांना अमराठी असल्याने विरोध केला. त्यामुळे संमेलनात काही विघ्न येऊ नये यासाठी त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. साहित्य संमेलनाचे आयोजक आणि साहित्य महामंडळाने यावर कठोर भूमिका घेणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. याचा निषेध करण्यासाठी आणि साहित्यिक, नागरिकांच्या संवैधानिक हक्कांच्या समर्थनासाठी विद्यार्थी संमेलन घेत आहेत.
प्रतिसाहित्य संमेलनाची भूमिका
संमेलनाचा आयोजक आणि विद्यापीठातील विद्यार्थी रामप्रसाद वाव्हळ याने ईनाडू इंडियाकडे प्रतिक्रीय व्यक्त केली. तो म्हणाला, की सहगल यांचे निमंत्रण अचानक रद्द करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे. हा केवळ सहगल यांचा अपमान नसून स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्व नागरिकांचा अपमान आहे. संवैधानिक मुल्यांची पायमल्ली होत असताना तरुणांनी गप्प बसणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही हे प्रतिसाहित्य संमेलन घेत आहोत.

अशी असेल संमेलनाची रुपरेषा
संमेलनाची सुरुवात सकाळी ११ वाजता ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर, नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून उद्घाटन होईल. याप्रसंगी एक परिसंवाद आणि कविसंमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. ज्या निमंत्रीत लेखकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला. त्या लेखकांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून कवयित्री, लेखिका डॉ. प्रतिभा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात प्रा. जयदेव डोळे, प्रा. प्रल्हाद लुलेकर, ऋषीकेश कांबळे, पी. विठ्ठल, आसारा लोमटे, संजय मून, रामंचंद्र काळुंखे आदी मान्यवर लेखक सहभाही होणार आहेत.

विद्यापीठाने नाकारली जागेसाठी परवानगी
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने संमेलन घेण्यासाठी हॉलची परवानगी नाकारली आहे. ही विद्यापीठाची दडपशाही आहे. काहीही झाले तरी हे संमेलन होईलच असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES