• A
  • A
  • A
पत्नीशी झालेल्या वादातून बापानेच केली पोटच्या मुलांची हत्या

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत २ मुलांचे मृतदेह आढळून आले होते. त्या खुनाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. त्या २ मुलांना निष्ठूर बापानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवत असल्याची माहिती मिळाली आहे. ही दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील रहिवासी आहेत. त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (३) आणि गणेश संतोष वाळुंजे (५) अशी आहेत.


हेही वाचा - विचित्र अपघातः चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याकडेच्या घरात घुसला,...
पोलिसांनी संशयित बापास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच आरोपीला गजाआड केले जाण्याची शक्यता आहे. वैजापूर तालुक्यातील बापुसाहेब कल्याण पवार यांच्या सावखेडगंगा येथील शेतगट नंबर-२ मधील विहिरीत शनिवारी दुपारी २ मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मुलांच्या शर्टावरील प्ले-ग्रुप जेऊर या नावावरुन ही मुले त्या शाळेतील आहेत का? याचा तपास केला. मात्र, या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले.

हेही वाचा - नववर्षाचा अतिउत्साह नडला, सुसाट वेगात निघालेल्या ४ विद्यार्थ्यांचा...
वाळुंजे कुटुंब औरंगाबाद रस्त्यावरील गल्ले बोरगाव येथे राहत होते. संतोष वाळुंजे हा औरंगाबाद येथे काम करत होता. पत्नीशी कडाक्याचे भांडण झाल्याने दोन्ही मुलांना घेऊन तो सावखेडगंगा परिसरात आला आणि त्याने दोन्ही मुलांना निर्दयीपणे विहिरीत ढकलून संपवले. याबाबत माहिती मिळताच वीरगाव पोलिसांच्या पथकाने संतोष वाळुंजे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES