• A
  • A
  • A
पदावरुन काढल्याने मनसे पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद - मनसेच्या शहर सहसचिव पदावरुन काढून टाकल्याने मनसे पदाधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभय मांजरमकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्रातून आपली व्यथा मांडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आत्महत्येस शहर जिल्हा अध्यक्ष सुमीत खांबेकर आणि राजु दादा पाटील यांना जबाबदार धरले आहे.


पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ठेवत त्यांना मनसेच्या शहर सहसचिव पदावरुन काढून टाकण्यात आले होते. पक्षात एकनिष्ठ काम केले त्याचे हे फळ मिळाले त्यामुळे आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही. राजसाहेब आणि वहिनीसाहेबांनी याची नोंद घ्यावी, असे त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

पक्षातून काढण्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्यानुसार मला माझी बाजू मांडू दिली नाही. मात्र, तसे न करता तडकाफडकी मला पदावरुन काढण्यात आले. राजू पाटील यांच्या सांगण्यावरुन सुमित खांबेकर यांनी कारवाई केल्याची तक्रार अभय याने केली आहे. औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अभय मांजरमरकर यांनी पदाचा गैरवापर केला असून एका हॉटेलमध्ये दारू पिल्यावर बिल देताना वाद घातला होता. त्यामुळे ही कारवाई केल्याचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी उस्मानपूरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.


आत्महत्येपूर्वी लिहलेले चिठ्ठी


पदावरुन कमी केल्याचा आदेश


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.