• A
  • A
  • A
कर्ज माफीसाठी शिवसेना आक्रमक, जानेवारीपासून सरकारविरोधात आंदोलन

औरंगाबाद - राज्य सरकारने घोषणा केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कर्जमाफीसाठी दाद मागितली. सरकारने कर्ज माफीच्या नुसत्या जाहिराती केल्या, मात्र प्रत्यक्षात हवी तशी कर्जमाफी दिली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही शिवसेनेने यावेळी केला आहे.

शिवसेना पदाधिकारी अंबादास दानवे



हेही वाचा - छगन भुजबळांनी मनुस्मृती जाळली; म्हणाले सरकारच्या 'घरवापसी'ची वेळ आली
सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन वर्षपूर्ती झाली. त्यानंतरही आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अनेक ठिकाणी कर्जमाफीला घेऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर सत्तेत राहून विरोध करणाऱ्या शिवसेनेने औरंगाबादमध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. तर शिवसेना गावोगावी कर्जमाफीपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांच्या बँकेसमोर परिषद आयोजित करुन जनजागृती करुन सरकार विरोधात आंदोलन करेल, असा इशारा याबाबत औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला.

हेही वाचा - आमची काँग्रेसला ऑफर मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद नाही- प्रकाश आंबेडकर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES