• A
  • A
  • A
सावधान! मोबाईल चार्जरचा स्फोट झाल्याने एका युवकाचा मृत्यू

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील जेहूर येथे एका तरुणाला मोबाईल चार्जिंग करणे भलतेच महागात पडले आहे. मोबाईल चार्जरचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


संजय तातेराव पवार (वय ३४) असे तरुणाचे नाव असून मोबाईल चार्जर फुटल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. संजय गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजता जेवण करुन मोबाईल चार्जिंगला लावत असताना जास्तीचा वीज पुरवठा झाला आणि चार्जरचा स्फोट झाला.

वाचा - श्रीपाद छिंदमला सभागृहात मारहाण; शिवसेनेला मतदान करण्याचा प्रयत्न
कन्नड येथील प्राथामिक आरोग्य केद्रांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आकस्मित मृत्यची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आपण हे मोबाईल किंवा चार्जर वापरत असताना सावधानता बाळगायला हवी तसेच मोबाईल अथवा चार्जर जास्त गरम होत असल्यास वेळीच त्याची तपासणी करावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES