• A
  • A
  • A
छगन भुजबळांनी मनुस्मृती जाळली; म्हणाले सरकारच्या 'घरवापसी'ची वेळ आली

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज जिल्ह्यातील वैजापूर येथे मनुस्मृतीचे दहन केले. केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर ताशेरे ओढत हे सरकार सर्वच पातळ्यांवर फेल असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच सरकारच्या घरवापसीची वेळ आली असल्याचे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने वैजापूर येथे आयोजित समता मेळावा व बहुजन हक्क परिषदेत बोलत होते.

मनुस्मृती दहन करताना छगन भुजबळ


छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन करुन ओबीसी आणि मागासवर्गीय घटकांना समता परिषदेसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. भुजबळ यांनी यावेळी मोदी आणि फडणवीस सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले, की जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि महिलांना सुरक्षा गरजेची असताना केंद्र आणि राज्यातील सरकरमध्ये बसलेले लोक वेगवेगळे विषय घुसवून जनतेची दिशाभूल करत आहेत. सरकारच्या सर्व योजना अपयशी झाल्या असून विकासाच्या सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी झाल्याची टीका भुजबळांनी केली. तसेच सध्याच्या सरकारची 'घरवापसी' करण्याची वेळ आली आहे, असेही भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

छगन भुजबळ यांच्या हस्ते समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये जाळण्यात आलेल्या मनुस्मृतीमुळे सर्वांचेच लक्ष त्यांनी वेधून घेतले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची तोफ महाराष्ट्रभर धडाडणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES