औरंगाबाद शहरातील स्मार्ट बससेवेचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱया शहर बस सेवेचा उद्घाटन समारंभ रविवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. आज शहरातील क्रांती चौक येथे चार शहर बस उद्घाटनासाठी खास सजवण्यात आल्या होत्या. आता औरंगाबादकरांच्या सेवेत नवीन बसची भर पडणार आहे.
हेही वाचा- औरंगाबादच्या अतिसंवेदनशील भागात मंदिरातील दानपेटीची धाडसी चोरी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून शंभर बस खरेदी करण्यात आल्या आहेत. बसची डिझाइन अंतिम झाल्यानंतर ७ डिसेंबरला कंपनीने पहिली बस शहरात पाठविली होती. ही बस विविध भागांत फिरवून शहर बस सेवेची प्रसिद्धी केली गेली. त्यानंतर २३ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बस सेवेचा प्रारंभ केला जाणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पाड्ण्यात आला.