• A
  • A
  • A
औरंगाबादच्या अतिसंवेदनशील भागात मंदिरातील दानपेटीची धाडसी चोरी

औरंगाबाद - शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजाबाजार भागातील गणपती मंदिरामधील दान पेटी रविवारी चोरीला गेली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता मंदिराचे पुजारी ओमकार दीक्षित यांच्या निदर्शनास आली. पहाटे रिक्षातून आलेल्या २ चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे.


मंदिराच्या दर्शनी भागात असलेली स्टीलची दान पेटी लोखंडी रॉड पासून वेगळी करत चोरुन नेण्यात आली. ही घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पथकासह मंदिर परिसराची पाहणी केली. दरम्यान मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरटे आलेल्या रिक्षाचा क्रमांक दिसत आहे.

वाचा - एमआयडीसीत चोऱ्या करणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात
पहाटे ४.४७ वाजता २ चोरटे मंदिरात येतात. यातील एक जण लोखंडी ग्रीलवरुन आतमध्ये प्रवेश करुन दानपेटी उचलताना दिसत आहे. रिक्षाच्या मागील बाजूस हर्सूल परिसरातील एका प्रतिष्ठित इंग्रजी शाळेचे नाव आहे. दानपेटी चोरी केल्यानंतर दोघेही शहगंजच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र, शहराच्या मुख्य भागात एवढ्या धाडसी चोरीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थीत होत आहे.

वाचा - दौंडमध्ये भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरी


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES