• A
  • A
  • A
औरंगाबादमध्ये कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, २ तरुण जागीच ठार

औरंगाबाद - शहराजवळील माळीवाडा परिसरात कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कन्नड रस्त्यावरील दौलताबाद टी-पॉईंट ते माळीवाडादरम्यान आज पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला. पराग कुलकर्णी आणि अरूण काकडे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मृत दोघेही एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होते.

मृत पराग कुलकर्णी


हेही वााचा- औरंगाबादच्या एमजीएममधील विद्यार्थिनी आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्यास उत्तर प्रदेशमधून अटक
पराग कुलकर्णी हे मूळचे जळगाव सुपे येथील रहिवासी होते. गेली काही वर्ष कामानिमित्ताने ते औरंगाबाद येथील कासलीवाल तारांगण येथे राहत होते. कामानिमित्ताने पराग मित्रासोबत बाहेर गेले होते. काम संपवून घरी परत येत असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेत दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वााचा- राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा - पृथ्वीराज चव्हाण
औरंगाबाद नाशिक हायवेवरील दौलताबाद टी-पॉईंट ते माळीवाडा परिसरात रात्रीच्या वेळी नेहमीच जड वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे अपघात का आणि कसा झाला याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वााचा-झरीन खानची एक झलक पाहण्याच्या कारणावरून २ गटात तुंबळ हाणामारी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES