• A
  • A
  • A
माघी वारी निमित्त सोलापुरात अवतरली अवघी पंढरी

सोलापूर - माघ वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्यावतीने सोलापुरात पहिल्या रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या वारीसाठी पंढरपुरकडे पायी चालत जाण्याची मोठी परंपरा सोलापुरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायी धुळी लागो मज॥ या न्यायाने सोलापुरमध्ये सुधाकर महाराज इंगळे यांच्या पुढाकारातून मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला.हेही वाचा - पोलीस भरती विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

संजय पवार, बळीराम जांभळे यांनी सुरुवातीला रिंगण लावून घेतले. त्यानंतर प्रत्येक दिंडीतील ध्वजाधारी यांनी पालखीला गोल प्रदक्षिणा मारून रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. तुळशी वृंदावनधारी महिलांचे व मृदंगवादकांचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी व चोपदारांच्या रिंगणास उत्साहामध्ये प्रारंभ झाला. विणेकरी हे प्रत्येक दिंडीतील मानकरी असतात आणि ते वयोवृद्ध असतात. तरीसुद्धा या वातावरणामध्ये एक वेगळीच उर्मी त्यांच्या शरीरात प्रवेश करून हे सर्वजण धावत रिंगण पूर्ण करतात. यानंतर अश्‍वाचे मुख्य रिंगण सुरू झाले आणि संपूर्ण वातावरणच माऊलीमय झालेले दिसून आले.

याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये सर्व दिंडीतील भाविकांनी वारकरी पेहराव परिधान करून नॉर्थकोट मैदानामध्ये आगमन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.


हेही वाचा - सयाजी शिंदेंच्या रोखठोक भूमिकेमुळे लोकांनी वाजवल्या टाळ्या तर सुशीलकुमार ओशाळले
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES