• A
  • A
  • A
पोलीस भरती विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस भरतीच्या संदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरात निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाच्यावतीने काढण्यात आलेला जीआर हा तरुणांवर अन्याय करणारा असून पोलीस दल सक्षम होण्याऐवजी दुबळे होण्याची भीती व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले.हेही वाचा - शिक्षक भरतीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा

महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने १८ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय घेऊन पोलीस भरतीचे निकष बदलले आहेत. नवीन नियमात बदल करत असताना अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी चाचणी असा निर्णय घेऊन मैदानी चाचणी देखील १०० मार्क वरून ५० मार्कची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या वेळेस सरकारने भरती प्रक्रियेत केलेला हा बदल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांवर आणि ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

मागील पाच वर्षांमध्ये रिक्त पदावर भरती केली गेलेली नाही. ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील तरुण मागच्या पाच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी जुन्या भरती प्रक्रियेनुसार करत आहेत. जुन्या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जायची त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची त्यानुसार महाराष्ट्रभरातील तरुणांनी तयारी केलेली असताना नवीन बदलानुसार भरती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात या भरतीपासून तरुण वंचित राहतील आणि बेरोजगारी वाढेल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीने व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.


हेही वाचा - पोलीस भरतीबाबत सरकारचे धोरण म्हणजे अगोदर मूल आणि नंतर लग्न - भाऊसाहेब आंधळकरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES