• A
  • A
  • A
देशामध्ये आरएसएसच्या दहशतवाद्यांचे हल्ले, जोगेंद्र कवाडे यांचा आरोप

सांगली - देशाच्या सीमेवर शत्रूंचे आतंकवादी हल्ले सुरू आहेत, तर देशाच्या आतमध्ये आरएसएसचे आतंकवादी हल्ले सुरु असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ते मंगळवारी सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जोगेंद्र कवाडे, नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टी


मोहन भागवत यांनी देशाच्या सैनिकांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्या वक्तव्यामुळे देशातील सैनिकांचा अवमान झाल्याचा आरोप कवाडे यांनी केला. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ येत्या २८ फेब्रुवारीला मुंबईमध्ये संविधान बचाव समितीच्या माध्यमातून मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या मोर्चामध्ये दोषींना अटक करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात येणार आहे.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  MAJOR CITIES