• A
  • A
  • A
साहित्यिकांनी लिहावे अन्यथा महाराष्ट्रावर पश्चातापाची वेळ - राज ठाकरे

सांगली - महाराष्ट्रातील आजच्या स्थितीवर साहित्यिक गप्प का आहेत, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी साहित्यिकांनी लिहिले पाहिजे अन्यथा पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सांगलीतील साहित्य संमेलनात बोलताना दिला आहे.


कवी सुधांशू यांच्या जन्मशताब्दी निमित्य सांगलीच्या औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचा समारोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की आज महाराष्ट्राची वाटचाल कशा पद्धतीने सुरु आहे हे बघण्याचे काम साहित्यिक, कवी यांचे आहे. समाजाची मशागत करण्याचे, लोकांना समजावून सांगण्याचे काम हे साहित्यिकांचे आहे. मात्र, हे काम आज साहित्यिक करताना दिसत नाहीत अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

दक्षिणेत राज्याच्या अस्मितेचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्यावेळी तिथे सर्वच साहित्यिक तसेच समाजातील इतर घटक रस्त्यावर येतात आणि केंद्राला त्यांच्या समोर झुकावे लागते. मात्र महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाही, अशी नाराजीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांना जातीने बघण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना जात विचारली जाते हे दुर्देवी आहे, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES