• A
  • A
  • A
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे - अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार महानगरपालिकेत घडला आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या समोरच हा प्रकार घडला.

महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तसेच नगरसेवक हे शहरातील जलपर्णी हटवण्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करत सोमवारी महापौरांच्या दालनातच आंदोलन करत असताना हा प्रकार घडला आहे. जलपर्णी हटवण्याच्या कामात भाजप नेते आणि महापालिकेतील अधिकारी यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना नगरसेवक आणि निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली.


निंबाळकर यांनी प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांची लायकी काढल्याने प्रकरण अधिक चिघळले आणि नगरसेवकांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना मारहाण केली. यावेळी महापौर दालनात मोठा गोंधळ उडाला आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने अतिरिक्त आयुक्तांना दालनाच्या बाहेर नेले. मात्र, महापौरांच्या दालनातच अतिरिक्त आयुक्तांना मारहाण झाल्याने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES