• A
  • A
  • A
'देशाला पाकिस्तान करायचे नसेल तर हिंदूंमधील हाफिज सईदला घाला आळा'

कोल्हापूर - हिंदुत्ववादी संघटना या देशाचे राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी परखड टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते शहरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंदुत्ववादी संघटनांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे त्यांनी म्हटले. भारताचा पाकिस्तान होऊ द्यायचा नसेल तर हिंदूत्ववाद्यांमधील हाफिज सईदला आळा घातला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संग्रहित छायाचित्र - प्रकाश आंबेडकर


अॅड. प्रकाश आंबेडकर शनिवारी शहरात आले होते. यावेळी, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी नियंत्रित, अनियंत्रित संघटनांच्या वर्चस्वातून समाजात जातीय तेढ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप केला.


कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी मानवंदनेसाठी आलेल्या समुहावर हल्ले झाले. तसेच त्यांच्या वाहनांची मोडतोड, जाळपोळ करण्यात आली ही त्यांची नांदी असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान निष्पाप नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ का झाली? याचे उत्तरही सरकार देत नाही. शिवाय सरकारने याप्रकरणी साधा एफआयआरही दाखल केला नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागल्याची त्यांनी कबुली दिली. काही संघटनांनी जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण देशभरात निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण सरकारने प्रथम थांबवावे, असे आवाहन आंबडेकरांनी आवाहन केले. कोरेगाव भीमा घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात येणारे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश दलित व निवृत्त नसावे, अशी त्यांनी अपेक्षा केली.

दरम्यान त्यांनी सर्किट हाऊस येथे विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी बंद कालावधीत वाहनांची झालेली मोडतोड आणि पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली.

‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी काहीजणांवर दरोड्याचे, तर काहीजणांवर ३०७ कलम लावणे हा आतताईपणा असल्याची टीका आंबडेकर यांनी केली. दंगलीचे खापर मात्र त्यांनी प्रतिमोर्चावर फोडले. दरम्यान दंगलीमध्ये गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची न्यायालयामार्फत आम्ही सुटका करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES