• A
  • A
  • A
थांबता थांबेना..! तुऱ्हाटीच्या गंजीची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ - सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपविले आहे. शेतातील तुऱ्हाटीच्या गंजीची चिता रचून माधव रावते या वृद्ध शेतकऱ्याने आगीत स्वतः ला भस्म करून घेतले आहे.


उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावातील ही दुर्दैवी घटना आहे. जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शंकर चायरे या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्या घटनेला आठवडा उलटण्याअगोदरच ही धक्कादायक घटना घडली आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनअंतर्गत सावळेश्वर हे दुर्गम गाव येते. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना उघडकीस येताच जिल्हा हादरला आहे. शिवाय प्रशासकीय यंत्रणेतदेखील खळबळ उडाली आहे. मृत माधव रावते या वृद्ध शेतकऱ्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे ते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ६० हजारांचे कर्ज असल्याने ते चिंताग्रस्त होते. अशात ते शेतात गेले आणि तुऱ्हाटीच्या गंजीची चिता रचून ती पेटवली. या आगीत त्यांनी स्वतः ला झोकून देत आत्महत्या केली.


याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिली. त्यानंतर तलाठ्यांनी आत्महत्येबाबतचा अहवाल सादर केला. दरम्यान, या आत्महत्या प्रकरणाची वस्तुस्थिती नेमकी काय, याबाबत पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES