• A
  • A
  • A
'शरद पवारांना फक्त शिवसेना-भाजपात घेऊ नका, मग आम्ही टीका करायची कोणावर ?'

अमरावती - आम्ही ज्या विरोधकांवर टीका करतो ते सरळ भाजप किंवा सेनेत प्रवेश करत आहेत. शरद पवारांना फक्त तुमच्या आमच्या पक्षात घेऊ नका, अशी जाहीर टीका शिवसेना प्रमुख उद्घव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये केली आहे. सगळे विरोधक आपल्या पक्षात येतील तर टीका करायची कोणावर ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विरोधकांची चांगली फिरकी घेतली.

उद्धव ठाकरे


आज संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला नारळ युतीने फोडला आहे. शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आज भाजप- शिवसेना युतीच्या अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम , यवतमाळ येथील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांच्या महामेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला सत्ता नेत्यांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी नको. आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सत्ता देणाऱ्या सर्वसामान्यांना न्याय मिळावा. त्यांच्या पर्यंत शासनाच्या योजना पोहचाव्यात, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणाऱ्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी हा आमचा उद्देश आहे. असेही ते म्हणाले.
शासनाच्या या साऱ्या योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहचवण्यात आडकाठी आणणाऱ्या यंत्रणेतील शुक्राचार्यांना धडा शिकवला जावा हिच आमची सातत्याने मागणी होती. या मागणीसाठी आम्ही आवाज काढला याचा अर्थ आता युती संपणार असे नव्हते. देशात भगवा फडकावा हेच आमचे ध्येय आहे, आणि नरेंद्र मोदी हेच कार्य करत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान आहे. पूर्वी हिंदू म्हणजे शिवी वाटायची, आज हिंदू असल्याचा गर्व बाळगला जातो. हे सगळ जुनी सत्ता उलथवून टाकल्यानेच शक्य झाले. आज बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी हयात असते तर त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित होत असल्याचे पाहून त्यांना फार आनंद झाला असता असेही उद्धव यांनी नमूद केले.
अमरावतीत आनंदराव अडसूळ यांनी विरोधकांची काळजी करू नये. जे कोणी गारुडी पुंगी वाजवत आहेत, त्यांची पुंगी ही गाजराची असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांना लगावला. आता भाजप-सेना असा कार्यकर्त्यांचा भेद न करता सारे मिळून राज्यात सर्व जागा भाजप- सेना युतीने काबीज कराव्यात. मुख्यमंत्री आणि मला एक मंचावर सर्वांना पहायच होतं आता आम्ही सोबत मंचावर आलो आहोत. आता सगळे कामाला लागा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES