• A
  • A
  • A
भाजप-सेना युती म्हणजे फेव्हीकॉलचा मजबूत जोड; तुटणार नाही - मुख्यमंत्री

अमरावती - भाजप शिवसेना युती म्हणजे फेव्हीकॉलचा मजबूत जोड आहे, ती कधीही तुटणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे. ते आज (शुक्रवार) अमरावती येथे लोकसभा निवडणुकीच्या युतीच्या महामेळावा येथील संत संस्कृती भवनात प्रचाराच्या श्रीगणेशा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.


या महामेळाव्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुळ, यांच्यासह अमरावती परिसरातील भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आमचे मोदी साहेब नेहमी म्हणतात पवार साहेबांना हवावो का रुख पता चलता है, आता पवार साहेबांना खरच हवा कुठे जात आहे ते कळालेच आहे, असे म्हणत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, जन आरोग्य योजनेचा लोकांना फायदा होत आहे. गरिबाला या योजनेचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांची योजना सरकारने आणली आहे. १० हजार किलोमीटरचे रस्ते राज्य सरकारने केले आहे. १८ हजार गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही निकाली काढला आहे. २७ टक्के उद्योग केवळ महाराष्ट्रामध्ये उभारले गेले आहेत. आज आपण विकास कामे घेऊन मतदारांना पुढे जात आहे. प्रत्येक अडचण सुटली नाही पन ते आपण सोडणार आहोत, हे लोकांना माहीत आहे. आपली विकासाची गाडी आता सुसाट झाली आहे. असेही ते म्हणाले. यांच्यासह अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES