• A
  • A
  • A
'आई लवकर ये, माझा घात होणार आहे', आणि तासाभरातच...

ठाणे - 'आई लवकर ये, माझ्या जिवाचा घात होणार आहे', असा फोन येताच अवघ्या तासाभरात मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ मे रोजी घडली. आशा गायकवाड या महिलेने मुलीच्या सासरच्या व्यक्तिंविरोधात खून केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोवर मुलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशाराही मृत महिलेच्या आईने दिला आहे.

मृत महिला


हेही वाचा - लोकलमधून खाली पडलेल्या महिलेचा सुरक्षा जवानाने वाचवला जीव

वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परेरानगरात राहणाऱ्या निशा धनराज गायकवाड या युवतीचा दीड वर्षांपूर्वी अनिल गायकवाड नामक युवकाशी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच तिचा सासरकडील मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. पतीकडून मारहाण आणि दीर, सासू, सासऱ्याकडून शिवीगाळ सुरू झाली होती. याबाबत ती तिच्या बहिणींना वेळोवेळी फोन करून तिच्यावर होणाऱ्या त्रासाबाबत कळवित होती.

हेही वाचा - ५० हजारांच्या लाचप्रकरणी ‘त्या’ महिला उपायुक्तांवर गुन्हा दाखल

मृत्यूच्या तासाभराआधी तिने आईला फोन करून 'आज सगळे घरी आहेत, माझा घात होणार आहे', मला भीती वाटत आहे, तु लवकर ये.’ असे फोनवरून सांगितले होते. त्यामुळेच दिनांक १४ मे रोजी तिचा पती अनिल, सासू सोजरबाई, सासरा रंगनाथ आणि दीर गणेश यांनी संगनमताने तिचा खून केला आहे. असा आरोप करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मयत मनीषाची आई आशाबाई गायकवाड यांनी केला आहे. तसा तक्रारी अर्ज त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिला असून संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईपर्यंत मुलीचे प्रेत ताब्यात घेणार नाही, असा इशारा या अर्जात देण्यात आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES