• A
  • A
  • A
धोकेबाज मित्राचा ब्लॅकमेल करून पत्नीवर अत्याचार; पतीची आत्महत्या

ठाणे - धोकेबाज मित्राने पत्नीला ब्लॅकमेल करुन अत्याचार केला. यामुळे समाजात पत्नीची बदनामी झाली. या विवंचनेत पतीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंकज, असे लिंगपिसाट आरोपीचे नाव आहे.

सांकेतिक छायाचित्र


हेही वाचा - औरंगाबाद दंगलीत जखमी पोलीस अधिकाऱ्याचा शुद्धीवर येताच पहिला प्रश्न..

मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मृत पती त्याची पत्नी आणि तीन मुलांसह एका चाळीत राहत होता. त्याच परिसरातील एका इमारतीमध्ये त्याचा मित्र पंकज राहतो. दोन महिन्यांपूर्वी मृतकाची पत्नी बाथरूममध्ये सायंकाळच्या सुमारास अंघोळ करत होती. त्यावेळी घरात व अंगणात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधम पंकज त्याच्या घरात घुसला. नराधम पंकजने मित्राच्या पत्नीचे अंघोळ करत असतानाचे आक्षेपार्ह छायाचित्र घेतले.

हेही वाचा - फोडाफोडीशिवाय भाजपला सत्ता मिळविणे अशक्य; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

दोन दिवसांनी आरोपी पंकजने मृतकाच्या पत्नीला मोबाईलमध्ये ते आक्षेपार्ह छायाचित्र दाखवले. शारीरिक संबंध ठेव नाहीतर सगळ्यांना हे फोटो दाखवेन, अशी धमकी त्याने मित्राच्या पत्नीला दिली. रात्रीच्या सुमारास तू मागचा दरवाजा उघडा ठेव, अशी धमकी देवून तो निघून गेला. या धमकीमुळे पत्नी भयभीत झाली होती. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास घरात घुसून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि पुन्हा धमकी देवून निघून गेला.

पुन्हा २ मेला आरोपीने कल्याण रेल्वे स्थानकात मृतकाच्या पत्नीला बोलावले आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेच्या नातेवाईकाने तिला आरोपीसोबत पहिले. यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर मृत मित्राच्या पत्नीने कोनगाव पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार कथन केला. आरोपी पंकज विरोधात भादवी ३७६, ४५२, ५०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे कोनगाव पोलिसांनी पंकजला अटक केली होती.

दरम्यान मित्राने दिलेला धोका आणि पत्नीची झालेली बदनामी या घटनेने व्यथित झालेल्या पतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी आणि मुले, असा परिवार आहे. या आत्महत्येची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES