• A
  • A
  • A
'पक्षाचा आदेश असल्यास...', भाजप खासदार कपिल पाटलांच्या वक्तव्याने शिवसेनेत खळबळ

ठाणे - पक्षाने आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा निवडणूक लढवू, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजप व शिवसेना युतीत पालघर लोकसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार पाटील बोलत होते.


हेही वाचा - बॅलेट पेपरवर मतदान घेऊन एकदाचा ईव्हीएमचा संशय दूर करा - उद्धव

कर्नाटक राज्यात भाजप बहुमताकडे वाटचाल करत आहे. अशातच राज्यातील भाजप-शिवसेना युतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्यासारखे विधान खासदार पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. खासदार पाटील पुढे म्हणाले, की भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा माझा होमपिच आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यामुळे भिवंडीत लोकसभा मतदारसंघात पक्षाची स्थिती चांगली आहे. मात्र पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास आपण रिंगणात उतरू, असे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - कर्नाटक विधानसभा त्रिशंकू, सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

दरम्यान भाजपच्या वतीने कल्याण लोकसभेसाठी डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेमधून खासदार कपिल पाटील आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे दावेदार असले तरी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचेही वर्चस्व आहे. या तिघांमधून कोणाच्या पदरात कल्याण लोकसभेचे तिकीट पडेल हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होईल.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES