• A
  • A
  • A
विकृत.. विवाहितेची अंतरवस्त्रे न्यायचा चोरून.. अन् असे करून द्यायचा परत

ठाणे - विवाहितेचे अंतरवस्त्र चोरून त्यावर पेनाने लिहून पुन्हा जागेवर अंतरवस्त्र ठेवण्याचा विकृत प्रकार समोर आला आहे. मयुरेश असे या विकृताचे नाव आहे. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच हा विकृत फरार झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


मिळालेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय विवाहिता ही पतीसह भिवंडी तालुक्यातील आलिमघर परिसरात राहते. त्याच परिसरात विकृत मयुरेशही राहतो. पीडिता आपल्या घराच्या मागील बाजूस कपडे वाळत टाकण्यासाठी गेली असता तो गेल्या आठ दिवसापासून तिला लपूनछपून पाहत होता. तसेच पीडिता कामानिमित्त घराबाहेर जात असल्यावर तिच्यावर पाळत ठेवून पाठलागही करीत होता.

हेही वाचा-
आठवडी बाजारात नकली नोटा चलनात आणणाऱ्यांना अटक

समाजात आपलीच बदनामी होईल, या भीतीपोटी पीडिता या विकृताचे चाळे सहन करीत होती. या विकृताने पीडितेच्या घरामागे वाळत टाकलेले तिचे अंतवस्त्र १२ मे रोजी मध्यरात्री चोरून नेले. त्याठिकाणी दुसरे अंतरवस्त्र ठेवून त्यावर विवाहितेचे पेनाने नाव लिहिले व तिच्या मानात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेला घाबरून विवाहितेने घडलेला प्रकार पतीला सांगितला. पती विकृताला जाब विचारण्यासाठी गेला असता त्याने भावाच्या साथीने उलट पतीला बेदम मारहाण करत धमकी दिली.

हेही वाचा-
विठ्ठल पावला; ३ खुनातील फरार आरोपीला पंढरपुरात अटक

घडलेला प्रकार व पतीला झालेली मारहाणीमुळे पीडितेने धाडस करून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित विवाहितेच्या जबानीवरून विकृत मयुरेश व त्याचा भाऊ अजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विकृतावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.

हेही वाचा-
भाजपच्या 'चोरट्या' नगरसेवकाचा पराक्रम सीसीटीव्हीत कैदCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES