• A
  • A
  • A
भाजपच्या 'चोरट्या' नगरसेवकाचा पराक्रम सीसीटीव्हीत कैद

ठाणे - उल्हासनगर महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल लंपास करणारा भाजपचा नगरसेवक सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्रदीप रामचंदानी असे या उचल्या नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही बातमी देखील वाचा - वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात; १५ ठार, २५ गंभीर जखमी

प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. तर, त्यांचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. रामचंदानी यांनी गुरुवारी (१० मे) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटतून फाईल काढून शर्टात टाकली. हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री हे सीसीटीव्ही फुटेज समोर आहे.

ही बातमी देखील वाचा - शहरात तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू

याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने सदर स्वीकृत नगरसेवक आणखी अडचणीत सापडला आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES