• A
  • A
  • A
धक्कादायक ! सेक्स पॉवर इंजेक्शनचा ओव्हर डोस, प्रेयसीचा लॉजमध्ये मृत्यू

ठाणे - प्रियकरासोबत शय्यासोबत करण्यासाठी घेतलेल्या सेक्स पॉवरच्या इंजेक्शनमुळे त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील लॉजमध्ये घडली आहे. सेक्स पॉवरच्या ओव्हर डोसमुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


पोलीस सुत्रानूसार, मृत २९ वर्षीय महिला ही मुंब्रा परिसरातील अमृतनगर, येथे राहणारी आहे. तिला दोन अपत्यही आहेत. ही महिला ८ एप्रिल रोजी कल्याण येथील अमजद (नाव बदलले) या प्रियकरासोबत शहरातील कल्याण नाका, अशोका लॉज येथे आली होती.


त्यावेळी तिने सेक्स पॉवर वाढवणारे इंजेक्शन घेतले होते. त्यामुळे तिची अचानक प्रकृती बिघडली होती. त्यावेळी तिच्यासोबत असलेला प्रियकर तिला त्याच अवस्थेत तिला सोडून निघून गेला. बराच वेळ झाला तरी महिलेसोबत आलेला तिचा प्रियकर परत आला नाही. त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवजा उघडला असता महिला ही बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांनी तिला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला शुद्धीवर आणले.

त्यावेळी महिलेने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तिचे नाव आणि राहत्या घराचा पत्ता सांगितला. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याची खबर डॉ. सुमय्या शमीम अंसारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गोंजारी करीत आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES