• A
  • A
  • A
दाऊद म्हणतो भारतात येण्यास तयार पण.., राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य ठरले खरे

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात परतायचे आहे. मात्र त्याची एक अट आहे, की भारतात खटला सुरू असताना फक्‍त आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात यावे, अशी खळबळजनक माहिती दाऊदचे वकील श्याम केसवाणी यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती मंगळवारी ठाणे न्यायालयात पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचे सांगत श्रेय लाटणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

संग्रहित छायाचित्र


दाऊद सध्या कुठे आहे? या प्रश्‍नावर केसवाणी म्हणाले, की दाऊद कुठेही असला तरी त्याने मुंबईत परतण्याची स्वत:हून इच्छा व्यक्‍त केली आहे. सरकारने दाऊदच्या विरोधात हवा तो खटला चालवावा. मात्र, हा खटला चालेपर्यंत त्याला फक्‍त आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात यावे, अशी दाऊदची मागणी आहे.


दाऊदने यापूर्वीदेखील भारतात परतण्याची इच्छा व्यक्‍त केली होती का? या प्रश्‍नावर केसवाणी म्हणाले, की दाऊद मुंबईत येण्यास तयार आहे. सरकारने तशी पावले उचलावी आणि योग्य मध्यस्थीमार्फत वाटाघाटी सुरू कराव्यात. मात्र, दाऊदला भारतात आणण्यास काही अडचणी असल्याचे सरकारमधीलच काही लोक बोलत आहेत.

दरम्यान, दोन खंडणीच्या गुन्ह्यात इकबालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणीविरोधी पथकाने गोराई येथील जमीन प्रकरणात बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या तिसऱ्या गुन्ह्यात इकबालला पुन्हा पोलीस कोठडी चौकशीसाठी घेतली आहे. या तिसर्‍या गुन्ह्यातील सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर इकबालला मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दाऊदचे वकील आणि इकबालचा खटला लढवत असलेले ज्येष्ठ वकील श्याम केसवाणी यांनी ही माहिती दिली.

गेल्यावर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या एफबी पेजच्या लाँचिंगच्यावेळी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचे सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी फेसबुक पेजच्या लाँचिगच्या वेळी केला होता. दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे. दाऊदची भाजपशी सेटिंग असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES