• A
  • A
  • A
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उघड

ठाणे - दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी जंगलात नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. हे नराधम एवढ्यावरच न थांबता एकाने बलात्काराचे चित्रीकरणकरून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


याप्रकरणी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या जबानीवरून किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिघाही नराधमांना गजाआड केले आहे. धनाजी पाटील (२३) भरत वाळिंबे (२४) नितीन पाटील अशी या तिघा नराधमांची नावे आहेत.

शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी नातेवाईकांसह राहते. सुमारे महिनाभरापूर्वी तिच्याच गावात राहणाऱ्या तिघा नराधमांनी जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तिला घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी भयभीत झाली होती.

ही घटना सुमारे महिन्याभरापूर्वीची असून याप्रकरणी शुक्रवारी पीडितेच्या तक्रारीवरून तिघा नराधमांविरोधात बलात्कारासह पोक्सा व विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या तिघांनाही पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीआय शेट्टे करीत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES