• A
  • A
  • A
१८ हजारांच्या मोबाईलने केला घात, 'तिचे' अमूल्य आयुष्य उद्ध्वस्त

मुंबई - लोकलमध्ये होणाऱ्या अनेक चोरीच्या आणि अपघातांच्या बातम्या झळकत असतानाही अनेकजण लोकलच्या दारात उभे राहून फोनवर बोलताना किंवा गाणी ऐकताना आपण रोजच पाहतो. पण, बुधवारी अशी एक घटना घडली, जे ऐकूण तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. द्रविता सिंग (२३) ही तरुणी नेहमीप्रमाणे लोकलने प्रवास करत होती. पुढच्या काही क्षणांत आपल्यासोबत काय घडेल, याची तिला साधी कल्पनाही नव्हती. प्रवासादरम्यान फोनवर बोलताना ती दारात गेली अन् इथेच घात झाला.

द्रविता सिंग


लोकलच्या दारात फोनवर बोलत द्रविता उभी होती. यादरम्यान एका चोरट्याने तिचा १८ हजाराचा मोबाईल हिसकावण्यासाठी तिच्यावर बांबूने हल्ला केला आणि धावत्या लोकलमधून द्रविता धाडकन् खाली पडली. द्रविता रेल्वे रुळावर पडताच मागून येणाऱ्या दुसऱ्या लोकलची तिला धडक बसली. या धडकेत द्रविताला आपला एक पाय आणि हातांची काही बोटे गमवावी लागली आहेत.

चोरटा तर मोबाईल घेऊन पळाला, पण द्रविताच्या वाटेला आयुष्यभरासाठीचे अपंगत्व आले. १८ हजार रुपयांच्या मोबाईलमुळे सगळे होत्याचे नव्हते झाले. आता या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी होईल. पण, द्रविताच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसेल..?

समाजातील काही चोरट्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लुटारुंमुळे गुन्ह्याची शिक्षा द्रवितासारख्या कित्येक निष्पाप लोकांना भोगावी लागते. द्रवितासोबत जे घडले, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

द्रवितावर सध्या भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. द्रविताचे वडील तिच्या उपचारासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. उपचारासाठी किमान १५ ते २० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. या घटनेनंतर द्रविताच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी निर्ढावलेल्या अशा कुप्रवृत्तींना वेळीच ठेचण्याचे काम पोलीस यंत्रणेला इमानेइतबारे करावे लागेल. अन्यथा, आणखी एका द्रवितावर असा भयंकर प्रसंग उद्भवू शकतो. प्रशासनाची उदासीनता, पोलीस विभागाचे औदासीन्य या घटनेला निश्चितच कारणीभूत आहे. आपले कोण काय वाकडे करू शकणार, अशा अविर्भावात वावरणाऱ्या गुंड, चोरट्यांना वेळीच आवर घालण्याची वेळ आता आली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES