• A
  • A
  • A
प्रियकराच्या साथीने कापले पतीचे मुंडके, पत्नीसह प्रियकर गजाआड

ठाणे - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा २२ वर्षीय प्रियकराच्या साथीने पत्नीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना ७ जानेवारी रोजी भिवंडीतील नागाव परिसरात उघडकीस आली होती. हत्या झाल्यापासून फरार असलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून शांतीनगर पोलिसांनी सापळा लावून गजाआड केले.


पत्नी गुलशबा (२४) व तिचा प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कैफ उर्फ मनोजकुमार उर्फ राहूल जगदीशप्रसाद सोनी (३०) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैफ उर्फ मनोजकुमार सोनी याचा प्रेमविवाह गुलशबा हिच्याशी ७ वर्षांपूर्वी झाला होता. त्याने प्रेमिका गुलशबा हिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले होते. मृत मनोजकुमार हा गुलशबा व ३ मुलांसोबत नागाव परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. तो आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करत असल्याने दीड ते २ महिन्यांनी घरी येत असे.

३ जानेवारी रोजी तो घरी आला असता, त्याने पत्नीला रिजवानसोबत पाहिले. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आपल्या अनैतिक संबंधात आता पती अडथळा ठरत आहे, असे वाटू लागल्याने पत्नी गुलशबा व प्रियकर रिजवान यांनी मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने खून केला. त्याचे डोके शरीरापासून अलग केले व मृतदेह घरातच टाकून दोघे फरार झाले.

प्रेयसीसोबत फरार झालेल्या रिजवानने नातेवाईक शाबादला संपर्क करून घटनेची माहिती देवून यातून मार्ग काढण्यास सांगितले. मात्र शाबाद कुरेशी याने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव व मनजितसिंग बग्गा यांनी आपल्या पथकासह धाव घेवून दरवाजा उघडला असता घरात कैफ उर्फ मनोजकुमार यांचा मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत सापडला.

हत्येच्या दिवशीच आरोपी पत्नी तिन्ही मुलांना आजीकडे सोडून प्रियकरासोबत उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती तपास अधिकारी मनजितसिंग बग्गा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश लोखंडे यांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील एका गावातून पत्नी गुलशबा व तिचा प्रियकर रिजवान यांना सापळा रचून ताब्यात घेतले. आज दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास मनजितसिंग बग्गा करत आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES