• A
  • A
  • A
पोलिसाचा प्रताप; सात बायकांचा 'दादला' हवालदार निलंबित

ठाणे - डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सूर्यकांत कदम याने सात महिलांशी विवाह केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याची पत्नी प्रचिता कदम हिने आपल्या पतीचा प्रताप उघडकीस आणला आहे. प्रचिताने याप्रकरणी पोलीस उपायुक्तांकडेच तक्रार केल्याने याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी कदमला निलंबित केले आहे.


पोलीस उपायुक्तांनी कदमच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. तरी मात्र या सात महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कदमच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार की नाही, याकडे प्रचितासह फसवणूक झालेल्या त्याच्या अन्य बायकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी कदमच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र त्याच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.


अंबरनाथ येथील एका दवाखान्यात नर्सचे काम करणाऱ्या प्रचिताने कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे पती सूर्यकांत याने आपली फसवणूक केल्याची तक्रार केली होती. प्रचिता ही कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा येथील बालाजी पॅराडाईज सोसायटीत राहते. प्रचिताचा सूर्यकांतशी १९९२ साली विवाह झाला होता. सूर्यकांतने प्रचिता प्रमाणेच नोकरी करणाऱ्या इतरही महिलांशी लग्न केले आहे. सूर्यकांतने एक दोन महिलांशी लग्न केलेले नसून त्याने तब्बल सात महिलांशी लग्न केल्याची बाब प्रचिताने उघडकीस आणली आहे.

सूर्यकांतने त्याच्या जाळ्यात ओढलेल्या सातही महिला ह्या नोकरी करणाऱ्या होत्या. सूर्यकांत हा पोलीस असला तरी त्याचा हा प्रताप त्याच्या अंगाशी आला आहे. प्रचिताने त्याची पोलखोल करुन त्याला चांगलीच अद्दल घडविली आहे.

सूर्यकांतने सगळ्यात प्रथम १९८६ साली स्वाती नावाच्या महिलेशी लग्न केले. दुसरे लग्न १९९२ साली प्रचितासोबत केले. तिसरे लग्न १९९३ साली कांताबाई या महिलेशी केले. चौथे लग्न सूर्यकांतने १९९५ साली शर्वरी नावाच्या महिलेशी केले. त्याने १९९८ साली स्वप्नाली नावाच्या महिलेशी पाचवे लग्न केले. हेमलता नावाच्या महिलेशी २००७ साली त्याने सहावे लग्न केले आणि २०१४ साली वनिता हिच्यासोबत लग्न केले. यापैकी कांताबाई आणि शर्वरी याचे निधन झाले आहे. उर्वरीत पाच बायका या हयात आहेत. पोलिसाच्या सात लग्नाची कहानी सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. पोलीस हे कायद्याचे रक्षण करणारे समजले जातात. त्याच रक्षणकर्ता पोलिसाने सात जणींच्या आयुष्याशी खेळ खेळला आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES