• A
  • A
  • A
माढ्यात पवारांच्या एन्ट्रीनं भाजपचे गणित बिघडले, संजय शिंदेंचा लढण्यास नकार

सोलापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने आता भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. आतापर्यंत एकदाही पराभूत न झालेले मातब्बर नेते शरद पवार यांच्यासमोर भाजपकडून कोण उभा राहणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.


हेही वाचा - शरद पवारांनी माढ्यातूनच निवडणूक लढवावी, बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

संजय शिंदे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर थेट लोकसभा लढविण्याचा इरादा जाहीर करून मोहिते पाटिलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर डिसीसी बँक, दुधसंघ, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये मोहिते-पाटलांविरोधात मोहरा म्हणून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना अजित पवारांनी बळ दिले होते. मागील जिल्हा परिषद निवडणूकीनंतर राष्ट्रवादीचा पराभव करत शिंदे यांनी भाजपच्या मदतीने अध्यक्षपद मिळवले. त्यानंतर त्यांची पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच नेत्यांशी जवळीक वाढली. आता पुन्हा मोहिते पाटील लोकसभेला उभे राहिले तर त्यांच्या विरोधात भाजपने संजय शिंदे यांना माढ्याची जबाबदारी देण्याचे ठरविले होते. मात्र, ऐनवेळी शरद पवारांच्या एंट्रीने संजय शिंदे यांनी आपण लोकसभा न लढता विधानसभा लढणार असल्याचे सांगत भाजपची गणिते बिघडवली आहेत.

हेही वाचा - माढ्यातून शरद पवार लोकसभा लढवणार नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरणCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES